रविवार, १३ मार्च, २०११

चूक कुणाची ?
त्याच्या कामात आता त्याचा जम बसला होता... आता त्याला वेळ मिळू लागला...
त्याला तिची आठवण येऊ लागली... मनाशी चुकचुकला....
त्याने ठरवलं तिला भेटायला जायचं... पण आधी तिला कळवलं पाहिजे म्हणून त्याने फोन उचलला...
त्यावेळी त्याला जाणवलं किती दिवसांनी आपण तिच्याशी बोलणार...
कामाच्या व्यापात ती कशी आहे याचीही कधी चौकशी केली नाही.... याची त्याला जाणीव झाली...
या विचाराने अस्वस्थ झालेल्या त्याने तिला फोन लावला...
दिस नंबर डझ नॉट exist .... परत फोन ट्राय केला... पुन्हा तेच...
आता तो अगदीच अस्वस्थ झाला... काय करावे सुचेना...
त्याला तिच्या ऑफिसची आठवण झाली...
त्याने लगेच तिथे फोन लावला... तिच्या मैत्रिणीने फोन उचलला.... त्याने तिच्याबाद्द्दल विचारले... तो उत्सुक होता... आता तिचा आवाज ऐकायला मिळेल... मी येतोय हे सांगायचे होते त्याला...
तीचा आनदाने बहरून गेलेला आवाज ऐकायला तो आतुर झाला होता
त्याने तिच्याबद्दल विचारलेले ऐकून तिची मैत्रीण शांत झाली...
काय बोलावे काही कळत नव्हते तिला...
शेवटी तिने त्याला सांगितले....
now  she  is  no  more  ....
तो स्तब्ध झाला... त्याचा त्यःच्या कानावर विश्वास बसेना...
त्याने पुन्हा तिच्याबद्दल विचारले...
मैत्रीण पुन्हा म्हणाली... she  is  no  more  ....  खूप वाट बघितली तिने तुझी...
पण तू नाही आलास... शेवटी ज्या समुद्राच्या, मावळत्या सूर्याच्या साक्षीने तुम्ही सोबत राहायच्या शपथा घेतल्या त्याच समुद्राला तिने स्वतःला अर्पण केलं...
तो गप्प होता... त्याचा कशावरच विश्वास बसत नव्हता... ताडकन उठून तो तिच्या शहरात आला
खूप शोधलं त्याने तिला ती कुठेच नव्हती...
कशी असेल ती कुठे?... कारण ती या जगातच नव्हती.... सोडून गेली होती ती त्याला.
तो त्या समुद्राजवळ आला... त्यःच्या किनार्यावर घुडगे टेकून बसला... आज समुद्र शांत होता... आवाज फक्त त्याच्या रडण्याचा होता.
 ज्या ठिकाणी आम्ही एकमेकांना भेटलो... त्याच ठिकाणी तिने जीव दिला... का अस केलस?
मी तुझा आहे या गोष्टीवरचा विश्वास कसा ढळला तुझा?
काही दिवस लांब गेलो तर तू माझ्या वरच अविश्वास दाखवलास?
 आता तू मला उत्तर दे कि मी कसं जगू तुझ्या शिवाय?
जगू कि तुझ्या सारखच जीव देऊ?
.
.
ती गेलीय. तो एकटा आहे.  काय साध्य झाल दोघानाही... त्याने कामा सोबत तिच्याकडेही लक्ष दिले असते तर आज ती त्याच्या सोबत असती. जर तिने स्वतःला कामात गुंतवून आपला वेळ घालवला असता आणि त्याची वाट बघितली असती तर तो आज एकटा राहिला नसता....कुठलीही गोष्ट करताना स्वतः सोबत इत्तारांचाही विचार करा...
हा विचार न त्याने केला ना तिने....

२ टिप्पण्या:

  1. 'कुठलीही गोष्ट करताना स्वतः सोबत इतरांचाही विचार करा...हा विचार न त्याने केला ना तिने...'

    खरं आहे...निदान आपल्यात भावनेने गुंतलेल्यांचा तरी निदान करावा! दोघांनीही टोकाच्या भूमिका घेतल्या...हो ना?

    उत्तर द्याहटवा
  2. कधी कधी इतरांचा विचार करून ही स्वतः वर अन्याय करून घेतो.......अर्थात वाट बघण्या इतपत ती व्यक्ति त्या लायकीची असायला पाहिजे....

    उत्तर द्याहटवा