रोजच्या प्रमाणे मी बेलापूर हून ट्रेन पकडली... नेहमीच्या जागेवर बसायला गेले...
पण आज तिथे 'ती' बसली होती...जरा रागच आला मला तिचा...
माझी रोजची जागा तिने आज बळकावली होती... थोड्या घुश्यातच मी तिच्या बाजूला जाऊन बसले...
ती थोडी मळकटलेली होती म्हणून जरा लांबच बसले...
एकटक बाहेर बघत होती... तिच्या कुशीत तिची चिमुकली होती...
ती रडली कि ती तिची शून्यातली नजर काढून तिच्या मुलीला शांत करायचा प्रयत्न करायची...
पण तिला त्या मुलीला सांभाळाता येत नव्हत... खूप गोंडस होती ती मुलगी... तिच्या रडण्याने ट्रेन मधल्या सर्व बायकांचं लक्ष वेधलं जात होत
पण तिला त्या मुलीला गप्प करता येत नव्हत... तिच्या दुधाची बाटली काढली.. दुध पाजायचा प्रयत्न केला... उपयोग झाला नाही..
ते गोंडस बाळ रडतच होत....
आता प्रत्येक बाई तील आई जागी झाली होती...सगळ्याजणी तीला बडबडत होत्या... हे सगळ बराच वेळ चालू होत
सगळ्यांना आता संशय वाटत होता कि हि तिचीच मुलगी आहे ना... कि हिने कुणाची पोर चोरली आहे...
बायका स्पष्ट पने तीला तसं विचारात होत्या... नको नको त्या प्रश्नांनी त्यांनी तीला भंडावून सोडलं
इतक्यात चेंबूर स्टेशनवर कुणी एका दीड शहाण्या बाईने लेडी पोलीसला बोलावले...
थोडीशी राकटच दिसणारी ती पोलीस तिच्या जवळ आली... मला सरकवून ती तिच्या बाजूला बसली आणि तिची चौकशी सुरु केली..
पोलीस बाई जरा जास्तच खडूस पने आणि अगदी सराहित गुन्हेगाराशी बोलाव तशी तिची चौकशी करत होती...
थोडा वेळ 'ती' शांत राहिली पण नंतर तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली...
आंध्र प्रदेशच्या कुठल्याश्या छोट्या गावातली ती एका मुसलमान मुला सोबत मुंबई ला पळून आली ...
घरची परिस्थिती अगदी हलाकीची... त्यामुळे आपल्या प्रियकरा सोबत तरी आपल्याला सुखाने संसार करता येईल... हे स्वप्न बघत ती मुंबई ला आली...
स्वप्नांच्या या माया नगरीत कित्येकांची स्वप्न पूर्ण झालीयत तर कित्येकांची धुळीला मिळाली... तिचंही तेच झाल
इथे आल्यावर तीला पहिला धक्क्का बसला तो त्याच्या पहिल्या बायकोला बघून...... तिच्या सवतीनीला दोन मुली होत्या आणि त्याला मुलगा हवा होता
म्हणून त्याने हिच्याशी लग्न केलं... या सर्वातून सावरत असतानाच तीला दिवस गेले... आता तो तिची अगदी व्यवस्थित काळजी घेत होता पण तिच्या मनात भीती होती कि आपल्यालाही मुलगी झाली तर हा आपल्याला सोडेल... खूप हिम्मतीने तिने तिचे नऊ महिने पूर्ण केले... त्या प्रसुतींच्या वेदना मधेही ती देवाला मुलगा होऊ दे हेच विनवत होती... पण देवाने तीच ऐकल नाही...
तिला मुलगी झाली.... सर्व संपल... इतका वेळ हॉस्पिटल मध्ये अस्वस्थ होऊन फिरणारा तिचा नवरा तिला एकटीला टाकून निघून गेला होता...
बोटातली छोटीशी अंगठी एका नर्स ला देऊन तिने हॉस्पिटल मधून आपली सुटका करून घेतली...
ती ओली बाळनतीन तिच्या लेकीला घेऊन घरी आली... तो घरी नव्हता... त्याची बायको होती...त्या बाई ने तीच बाळंतपण काढल...
तो घरी आलाच नाही... चार महिने लोटले... आता त्याच्या पहिल्या बायकोनेही तिची साथ सोडली... तिला घरातून हाकलल...
काय करायचं? कुठे जायचं? या विचारात ती निघाली... रस्त्यावर दिवस काढले... लोकांच्या वखवखलेल्या नजरा तिला बोचत होत्या...
तिने गावी जायचं ठरवलं... नवीन जीवनाला सुरुवात करायची..
पण आपल्याला लोकांच्या संघर्षाला सामोरे जावं लागणार हे तिला ठाऊक होत...
कुणी साथ देणार नाही हे देखील तिला माहित होत... तरीही निघाली... आपल्या बाळाला तरी चांगल जीवन द्यायच्या उद्देशानं...
बेलापूर हून विटीला आणि विटी हून आपल्या गावी...
पण बायकाच बायकांना पुढे येऊ देत नाहीत... अगदी तसच... पण सर्व बायकांनी तिला चोर ठरवून टाकल होत... तेही तिच्याच बाळाला चोरल्याचा आरोप ठेवला तिच्यावर... खूप मुश्किलीने उचलेल्या तिच्या पावलांना लगाम घालायला सर्वजणी सरसावल्या होत्या....
ती अगदीच थकलेली दिसत होती... आपल्या आईचे दुख ऐकून आता ते बाळहि शांत झाल होत...
पान या प्रसंगामुळे आता ती तयार होती जगाला सामोरे जायला...
त्याने दिलेल्या दुखातून सावरून स्वताला सिद्ध करायला....
very nice...
उत्तर द्याहटवा