प्रेम
नेहमी वाटायचं कि ती त्याला खूप चांगली ओळखते...
लांब राहूनही त्यांच्यात खूपच कमी अंतर आहे.... तो फक्त तिचा आहे... फक्त तिचा
आनंदात होती... तिच्या स्वप्नांच्या जगात वावरत होती... त्या स्वप्नात तिचा संसार उभा करत होती...
त्याचही तिच्यावर खूप प्रेम होत... दोघ शरीराने एकमेकांपासून खूप लांब होती पण त्यांची मने जुळलेली होती...
सहा महिन्यात एकदा भेटायचे... खूप खुष असायचे... त्या दोन दिवसात सहा महिने पुरेल इतक प्रेम करायचे एकमेकांवर...
जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या दोघांना जगाची नजर लागली... नियती रागावली त्यांच्यावर...
त्याला प्रमोशन मिळाल... त्याच काम वाढलं, त्याला तिला भेटन शक्य होत नव्हत....
ती त्याची वाट बघत होती... दररोज त्यांच्या प्रेमाचा साक्षी असलेल्या त्या समुद्राला विचारात होती कि कधी येईल माझा सखा?
तो कामात इतका गुंतला होता कि त्याला तिच्या कडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता...
त्याच लक्ष न देन तिच्या जिव्हारी लागत होत... ती त्याला यायला विनवत होती पण त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता...
एकीकडे त्याला त्याच करिअर साद घालत होत तर दुसरीकडे त्याची प्रेयसी...
पण त्याला तिच्या हाके पेक्षा त्याच्या करिअर ची साद ऐकू आली
त्या सर्व आवाजात तिचा आवाज दबत गेला...
शेवटी दमली ती हाक मारून मारून...
परत एकदा त्या समुद्र जवळ गेली... किमान तो तरी माझा आवाज ऐकेल य अपेक्षेने...
पण आज त्याचीही इच्छा नव्हती तिचा आवाज ऐकायची...
त्याचा खळखळाट सुरूच होता... तिचा आवाज आणखी दबत गेला...
त्याच्या किनार्याशी उभी असलेली ती त्याला ऐकू जाव म्हणून त्याच्या जवळ जवळ जात राहिली...
जितक त्याच्या जवळ जात होती तितका त्याचा आवाज वाढत होता... तिचा आवाज दबत होता...
ओरडून ओरडून तिच्यातल बळ संपल... तिने स्वतःला समुद्राच्या हवाली केल...
सगळ संपल... समुद्र शांत झाला होता पण आता तिचा आवाज नव्हता... ती शांत होती...
तिच्या हाका संपल्या होत्या...
इतके दिवस तिला शांत राहून साथ देणार समुद्रही तिचा शेवटचा शब्द ऐकायला तयार नव्हता...
पहिलीच पोस्ट का बरं दु:खी?
उत्तर द्याहटवाअर्थात कधीकधी वाटतं की मन जितकं अधिक दु:खातून जातं तितकं लिखाण खोल होतं.
छान लिहिलयस...खरं खरं वाटावं इतकं...
धन्यवाद अनघा, तुझी कमेंट खूप महत्वाची होती माझ्यासाठी
उत्तर द्याहटवालिहायला सुरुवात केली तेव्हा मी थोडी दुखी होते म्हणून... पहिला ब्लॉग दुखी लिहिला
पण या नंतर सकारात्मक द्र्ष्टीकोन ठेऊन लिहेन...
पण मी लिहायला सुरुवात करण्याच सर्व श्रेय तुला जात...
तुझे लिखाण वाचूनच मला लिहायची प्रेरणा मिळाली
त्याबद्दलहि धन्यवाद